
दिवसागणिक
आभाळ कोडमडतय माझं
हातांना सोसावेल
एवढ्या बळाचा धनी कोण ?
जीवनाच्या पारड्यात
स्वप्नांनी कितीही ऊंची गाठो
अस्तित्वाचा एक वारा
धुळच धुळ दाही दिशी
निर्बलता
ही माझी मानसिक आहे
सवय हातांना
ओझ्याचीच झाली आहे
खूपच सहज
झालंय हे निळं वाळवंट
कधी डोक्यावर
तर कधी तळव्यावर निजलेल
खाचायच नाय
ही जिद्दही तेवढीच मोठी हाय
जमिनीचा मात्र
काही भरवसा नाय
हाडांचा आवाज
अधून मधून ऐकू येतो
आत्मा मात्र
पाय गाडून लढतो
कधीतरी
असाही दिवस देव देईन
आभाळ खूप उंचावर
अन् मलाही शांत झोप येईन
पण तोवर
दिवसागणिक आभाळ कोडमडतय माझं…….
